Versa HD Radiation Machine

Versa HD - मशीनचे फायदे

युद्ध मग ते कोणतेही असो. जिंकण्यासाठी आवश्यक असतात अत्याधुनिक अस्त्रे आणि म्हणूनच कॅन्सरसारख्या असाध्य रोगावर विजय मिळविण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेन्टर सतत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असते.

 • कॅन्सर विरुद्धच्या या लढाईसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर आमच्या भात्यात जगप्रसिद्ध Versa HD हे अत्यंत आधुनिक आणि अमोघ अस्त्र दाखल झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील हे पहिलेच याप्रकारचे मशीन आहे.
 • Versa HD मशीन मुळे रेडिएशन थेरपीमध्ये अतिशय अचूकता येऊन थेरपीचे दुष्परिणाम कमी होऊन जलद कॅन्सर निवारणासाठी मौलिक हातभार लागणार आहे.
 • Versa HD मुळे शरीरांतर्गत नाजूक अथवा गुंतागुंतीच्या भागातील जसे की, मेंदू, मणका, फुप्फुस, यकृत,प्रोस्टेट,स्तन आणि तोंड येथील कॅन्सर पेशींना लक्ष्य करता येणार आहे.
 • पारंपरिक रेडिओथेरपी सोबतच अतिशय गुंतागुंतीच्या स्टिरिओटॅक्टिक (Stereotactic Radiosurgery-SRS / Stereotactic Body Radiation Therapy- SBRT) शस्त्रक्रिया करण्यासाठी एक वरदान
 • Flattening Filter Free- FFF Beam: कमी वेळात अतिशय प्रभावी मात्रेचे (डोसचे) रेडिएशन
 • Active Breathing Coordinator-ABC: श्वसनामुळे होणाऱ्या हालचालींवर मात करून निरोगी पेशींना अबाधित ठेवून फक्त कॅन्सर पेशींनाच लक्ष्य करण्याची क्षमता असलेली पेटंट प्राप्त सिस्टिम
 • Real Time 4D Intra-Fraction Image Guidance: - Live CT Scan होत असल्याने 4D image दिसते
  - गुंतागुंतीच्या भागातील अगदी काही मिलीमीटर असणाऱ्या सूक्ष्म आकाराच्या गाठींना लक्ष्य करणे शक्य
  - इतर नाजूक अवयवांना रेडिएशनचा अपाय होत नाही
 • 6D Robotic System: मशीनमधील रोबोटिक 6D काऊच सिस्टिममुळे रुग्णाची स्थिती अगदी काही मिलीमीटरने बदलणेही शक्य- अतिशय परिणामकारक उपचार करता येतात
 • अत्याधुनिक रेडिओबियॉलॉजिकल मॉडेलिंग: मॉन्टे कार्लो या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने रेडिएशन डोसचीतीव्रता आपोआप नियंत्रित करणे व गाठींवर होणाऱ्या परिणामांचे अचूक निश्चितीकरण सहज शक्य - ठराविक केसेस मध्ये सहा आठवड्यांची ट्रीटमेंट एका आठवड्यात करणे शक्य
 • यासोबतच कॅन्सरवरील 3D Conformal Radiation Therapy- 3D CRT, Intensity Modulated Radiation Therapy-IMRT, Image Guided Radiation Therapy- IGRT, Volumetric Modulated Arc Therapy- VMAT, आणि Stereotactic Radiation Surgery- SRS उपचार प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
 • या मशीनद्वारे बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक TBI (Total Body Irradiation) व त्वचेच्या कॅन्सरवरील TSET (Total Skin Electron Therapy) उपचारसुद्धा करता येतात