Suraj Sir’s Award Function
कोल्हापूर कॅन्सर सेंटर त्याची उत्कृष्ट सेवा देण्यात नेहमीच अग्रणी असते. आजपर्यंत कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या अशा कामाची दखल समाजातील अनेक स्तरांतून पुरस्कारांमार्फत घेतली गेलीय. याच यादीत अजून एका मानाच्या सुवर्णपानाची भर पडली आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटरला ४ मार्च २०२२ रोजी नेक्सब्रॅन्ड कडून अलौकिक आणि अजोड कॅन्सर रुग्णसेवेसाठी मिळालेला पुरस्कार डॉ. सुरज पवार सरांनी स्वीकारला. अशी कामाची घेतली गेलेली दखल नेहमीच कोल्हापूर कॅन्सर सेंटरला अधिकाधिक सेवा करण्यास पाठबळ देत राहील
जागतिक महिला दिन
कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॅन्सर उपचारांबरोबर पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांचे मनोबल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला कॅन्सर सर्व्हाइव्हरनी त्यांच्या प्रेरणादायी कहाण्या सर्वांसमोर मांडल्या. कॅन्सर सर्व्हाइव्हर सौ. भावना बासुगडे आणि सौ. प्रिया पोरे यांनी उस्फुर्तपणे त्यांचा कॅन्सर विरोधी लढा सर्वांसमोर मांडला. त्यांच्या लढाईच्या कहाण्या ऐकून सर्वजण भावुक झाले मात्र आपण कॅन्सरविरोधी लढाई आपण नक्की जिंकू शकतो हा विश्वास सर्वांना मिळाला. डॉ. रेश्मा पवार यांनी महिलांमधील कॅन्सर आणि महिलांचे आपल्या दुखण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित केला. तसेच डॉ. पराग वाटवे यांनी आधुनिक काळातील स्त्री आणि तिची बदलती भूमिका याविषयी आपली मते व्यक्त केली.
एका कॅन्सर हॉस्पिटलची कहाणी म्हणजेच 'न मावळणारा सुरज'! जाणून घ्या या व्हिडिओद्वारे ...
एका कॅन्सर हॉस्पिटलची कहाणी म्हणजेच 'न मावळणारा सुरज'! जाणून घ्या या व्हिडिओद्वारे ...
डॉ. सूरज पवार यांच्या ’न मावळणारा सूरज, द स्टोरी ऑफ कॅन्सर सर्जन’ या पुस्तकाचं दिमाखदार प्रकाशन
डॉ. सूरज पवार यांच्या ’न मावळणारा सूरज, द स्टोरी ऑफ कॅन्सर सर्जन’ या पुस्तकाचं दिमाखदार प्रकाशन
मूत्राशयाच्या कॅन्सर विषयी सर्व लेखाजोखा, डॉ. निलेश धामणे यांच्यासोबत ZEE 24 तास वर लाईव्ह
मूत्राशयाच्या कॅन्सर विषयी सर्व लेखाजोखा प्रत्यक्षपणे डॉक्टर निलेश धामणे यांच्यासोबत ZEE 24 तास वर लाईव्ह
श्री बनकर थोडगे सरपंच, यांचे कॅन्सर रुग्णांसाठी केलेले कार्य!
कर्मयोग जगणं हे काय असतं याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री बनकर थोडगे ,सरपंच, गगन बावडा यांचे कॅन्सर रुग्णांसाठी केलेले कार्य!
गगन बावडा परिसरामध्ये श्री बनकर थोडगे हे देवदूत म्हणून ओळखले जातात कारण कुठलाही कॅन्सर रुग्ण आढळल्यास त्याला सर्वतोपरी साहाय्य करणे हाच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग समजून त्यांनी आत्तापर्यंत ६० पेक्षाही जास्त कॅन्सर रुग्णांना मदत केली आहे.
आज कोल्हापूर कॅन्सर सेन्टर मध्ये त्यांच्या या महान कार्याची पोचपावती म्हणून त्यांचा सत्कार डॉ रेश्मा पवार, डॉ योगेश अनाप, डॉ प्रसाद तानवडे यांच्या हस्ते केला गेला कोल्हापूर कॅन्सर सेन्टर अश्या देवदूतांचा कायमच ऋणी राहील.
कोल्हापूर कॅन्सर सेन्टर आणि सामाजिक बांधिलकी यांचे कायमच एक अतूट नाते
गोर गरीब गरजू रुग्णांना कोल्हापूर कॅन्सर सेन्टरने नेहमीच सर्वतोपरी मदत केलेली आहे आणि त्यामध्ये इतर संस्थासुद्धा हातभार लावीत आहेत
दि २१ ऑगस्ट २०२१ रोजी कोल्हापूर कॅन्सर सेन्टर, गोकुळ-शिरगाव, कोल्हापूर येथे कॅन्सर वरील उपचार घेत असणाऱ्या गरजू रुग्णांना अन्न धान्य वाटपाचा कार्यक्रम कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ सुरज पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.TBMSG , पुणे या सामाजिक संस्थे अंतर्गत काम करणाऱ्या बहुजन हिताय बॉईज हॉस्टेल, वाठार रोड, पेठ-वडगाव यांनी सदरचे अन्न धान्य वाटप हे त्यांना मिळणाऱ्या मदत निधीमधून कोल्हापूर कॅन्सर सेन्टरला पुरविले. या कार्यक्रमात बहुजन हिताय बॉईज हॉस्टेल तर्फे प्रकल्प प्रमुख श्री. निलेश कटकोळे, अधीक्षक श्री. दीपक शिवशरण, सदस्य श्री. आर्यकुमार आणि कोल्हापूर कॅन्सर सेन्टर तर्फे डॉ. योगेश अनाप, डॉ. प्रसाद तानवडे , डॉ. निलेश धामणे , संस्थेचे सी ई ओ डॉ. शिरीष भामरे आणि अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होता.सदर अन्न धान्य वाटपाचा लाभ ३० पेक्षाही जास्त कुटुंबांनी घेतला. डॉ सुरज पवार यांनी बहुजन हिताय बॉईज हॉस्टेल च्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
Dr. Suraj Pawar KMACON 21
Vision to Reality: A Journey from Kolhapur Cancer Centre to Robosurg Kolhapur Cancer Centre established in 2003, has been providing comprehensive and accessible services to cancer patients. In rural areas number of hospitals and health care providers are less than recommended numbers by the WHO. Rising costs and a lack of early detection were the biggest hurdles.
Dr. Suraj Pawar followed his vision to practice in a region with a rural backdrop and for whom treatment was not easily accessible and ensuring that the quality of treatment for these patients is not compromised.
न हरलेली उदाहरणं या पुस्तकाचा अनावरण सोहळा.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सर सारख्या आजारावर मात करून जगण्याची दिशा कशी असावी याची उत्तम उदाहरण देणाऱ्या आणि कधीही हार न मानणाऱ्या उदाहरणांचा संग्रह म्हणजेच न हरलेली उदा "हरणं". न हरलेली उदाहरणं या पुस्तकाचा अनावरण सोहळा.
जागतिक आरोग्य दिन निमित्य प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुरज पवार यांची कॅन्सर या विषयावर विशेष मुलाखत
"जागतिक आरोग्य दिन" निमित्य प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुरज पवार ( Chief Surgical Oncologist & MD Kolhapur Cancer Centre) यांच्या सोबत 93.5 Radio Orange -जिंदगी कुछ खट्टी कुछ मिठी या कार्यक्रमामध्ये "कॅन्सर" या विषयावर विशेष मुलाखत.
जागतिक कॅन्सर दिन निमित्य कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुरज पवार कॅन्सर या विषयावर केलेले बहुमूल्य मार्गदर्शन
जागतिक कॅन्सर दिन निमित्य प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुरज पवार ( Chief Surgical Oncologist & MD Kolhapur Cancer Centre) यांनी 93.5 Radio Orange -जिंदगी कुछ खट्टी कुछ मिठी या कार्यक्रमामध्ये "कॅन्सर" या विषयावर केलेले बहुमूल्य मार्गदर्शन.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त डॉ सूरज पवार सर यांचेशी कट्टा कोल्हापुरी यांनी संवाद साधला.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त डॉ सूरज पवार सर यांचेशी कट्टा कोल्हापुरी यांनी संवाद साधला. कर्करोगाबद्दल माहिती, लक्षणे, घ्यायची काळजी आणि बरे होण्याचे प्रमाण, त्यासंबंधी असलेले समाज गैरसमज ही दूर केले.
डॉ. सुरज पवार यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील बहुमूल्य योगदानाबद्दल Zee सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
चीफ कॅन्सर सर्जन आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सूरज भास्कर पवार यांनी ग्रामीण भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य आणि माफक दरामध्ये अत्याधुनिक उपचार मिळावे या उद्देशाने सुरु केलेल्या कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये मागील १० वर्षांमध्ये आजवर 35000 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत त्यापैकी 28000 रुग्णांवर मोफत उपचार केले गेले आहेत.
डॉ. सूरज पवार यांनी मुंबई मध्ये एमबीबीएस आणि एम एस केल्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधून कॅन्सर सर्जरी मध्ये सुपर स्पेशलाइजेशन केले. त्यानंतर अमेरिकेच्या न्यू यॉर्क मधील विश्वविख्यात मेमोरियल स्लोन कॅटेगरी कॅन्सर सेंटर मध्ये फेलोशिप केली.
अन्न नलिकेच्या कॅन्सर शस्त्रक्रियेमध्ये डॉ. सूरज पवार यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्या तंत्रज्ञानाला डॉ. पवार टेक्निक म्हणून जागतिक मान्यता मिळाली असून अमेरिकन बोर्ड ऑफ सर्जनच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. डॉ. सुरज पवार यांनी अंगिकारलेल्या रुग्णसेवाच्या व्रताचा अनेक कॅन्सरग्रस्त रुग्णांना लाभ झाला आहे. त्यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रामधील बहुमूल्य योगदानाबद्दल Zee सन्मान देऊन गौरव करण्यात आला
कॅन्सरतज्ञ डॉ. सूरज पवार यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान "रोबोटिक शस्त्रक्रिया" या विषयावर मार्गदर्शन
प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. सूरज पवार यांचे शस्त्रक्रियेमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान "रोबोटिक शस्त्रक्रिया" या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र. तर पाहायला विसरू नका रविवार दिनांक ३१ जानेवारी दुपारी ३.३० वाजता साम संजीवनी या विशेष कार्यक्रमा मध्ये.
कॅन्सर विरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता सज्ज आहे
कॅन्सर विरुद्धची लढाई अधिक तीव्र करण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता सज्ज आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान सोबतच तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांची टीम, योग्य निदान आणि उपचार आणि सेवाभावी स्टाफ यांच्यासोबत रुग्णांना कॅन्सर वर मात करण्याचा आत्मविश्वास. चला तर मग कॅन्सर विरुद्ध एक होऊया आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर सोबत कॅन्सर विरुद्धची लढाई जिंकूया.
On World Cancer Day Protect Yourself. - Dr. Suraj Pawar Sir
On World Cancer Day Protect Yourself.
“Let’s make more sense in World Cancer Day by building more awareness about it…. Let’s eradicate cancer for the rest of our lives !!!! ” - Dr. Suraj B. Pawar
Can Cancel Cancer by Dr.Suraj Pawar
March is National Colorectal Cancer Awareness Month. Your Certain lifestyle choices can reduce the risk of Colorectal Cancer. Consumption of a diet with high fiber, avoiding processed meat, avoiding smoking as well as drinking alcohol and increasing physical activities will help to reduce the risk of colorectal cancer. Early detection of cancer is possible with proper screening tests. If you have any symptoms, contact your doctor right away.