सांजवात सेवाश्रम प्रकल्प

पश्चिम महाराष्ट्रातील केवळ कॅन्सर रुग्णांसाठी समर्पित सेवाश्रम.

सांजवात सेवाश्रम प्रकल्प

कॅन्सर रुग्णांचे आयुष्य बऱ्याच अनपेक्षित वळणांवरून जात असते. काही रुग्ण, रुग्ण न राहता कॅन्सरमुक्त होऊन समाजात वावरतात. पण काही रुग्णांच्या आयुष्यात दुर्दैवाने असा क्षण येतो की वैद्यकशास्त्राची मर्यादा संपून जाते व जीवननाट्याचा शेवटचा अंक येऊन ठेपतो.

या करूण प्रवासात होणारी रुग्णाची शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक परवड त्याला अधिकच लाचार बनवून टाकते. आणि अशा वेळी गरज असते ती माणुसकी, आत्मीयता, सन्मान, वेदनामुक्ती आणि आपल्या माणसाच्या प्रेमळ साथीची.

मर्यादा वैद्यकशास्त्राला असतात, माणुसकीला नाही. ही जाण ठेवून, सामाजिक गरज पूर्ण करण्यासाठी छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फौंडेशन ने सुरू केलेला प्रकल्प..
सांजवात सेवाश्रम. Life with dignity.

पश्चिम महाराष्ट्रातील केवळ कॅन्सर रुग्णांसाठी समर्पित सेवाश्रम.

आपले सहकार्य अपेक्षित ठेवूनच हा मेरूपर्वत आम्ही उचलतो आहोत. आपण सढळ हस्ताने या आगळ्यावेगळ्या सामाजिक प्रकल्पाला हातभार लावालच, ही अपेक्षा.

Domestic Contribution – Regular Account
 • Account Name :
  Chhatrapati Shahu Cancer Research Foundation
 • Bank Name :
  The Kolhapur Urban Co-op bank Ltd
 • Branch :
  Rajarampuri, Kolhapur 416008
 • IFSC :
  KOLH0000004
 • Account No :
  00041101001797
Foreign Contributions – FCRA Account
 • Account Name :
  Chhatrapati Shahu Cancer Research Foundation
 • Bank Name :
  State Bank of India
 • Branch :
  New Delhi Main Branch 110001
 • IFSC :
  SBIN0000691
 • Account No :
  40200314035